समाजाभिमुख कार्य करून इतरांच्याही जगण्यावर प्रेम करायला शिकावे - व्याख्याते विक्रम अवचिते.

By : Sangharshkranti Team ,2026-01-19

समाजाभिमुख कार्य करून इतरांच्याही जगण्यावर प्रेम करायला शिकावे - व्याख्याते विक्रम अवचिते.

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.19 जानेवारी 2026

(उज्वला उल्हारे)

दररोजच्या धावपळीच्या जीवनात जगणारा माणूस सध्या संकुचित वृत्तीने ग्रस्त होत आहे, स्वतःच्या सुखासाठी अहोरात्र झटणारा माणूस इतरांना कमी समजण्याची चूक करू लागला आहे. समाजातील प्रत्येक घटक हा सारखाच महत्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने समाजात राहत असताना सामाजिक कार्ये करून समाजाच्या विकासासाठी हातभार लावावा आणि आपल्याप्रमाणे इतरांच्या ही सुखात सहभागी होऊन त्यांच्याही जगण्यावर प्रेम करावे असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते शिवशाहीर विक्रम अवचिते यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बाणेश्वर शिक्षण संस्थेचे आर्टस्, सायन्स, अँड कॉमर्स कॉलेज, बुऱ्हाण नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला  संपन्न झाली. तीन दिवसीय व्याख्यानमालेत नामांकित वक्त्यांची व्याख्याने झाली, यावेळी तिसरे आणि शेवटचे व्याख्यान प्रसिद्ध व्याख्याते शिवशाहीर विक्रम अवचिते यांनी  जगण्यावर शतदा प्रेम करावे या विषयावर दिले.

यावेळी प्राचार्य श्री. जाधव सर, केंद्र कार्यवाहक प्रा.मयुरी बारवकर मॅडम, प्रा. ब्राम्हणे सर, प्रा.शेख सर, उपस्थित होते, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. 

दिवंगत आमदार कै. कर्डीले साहेब यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी शिक्षणसंस्था उभारली, इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला, गोरगरीब जनतेच्या अडचणी समजून त्यावर मार्ग काढला, खऱ्या अर्थाने साहेब इतरांसाठी जगले, त्यामुळे आपण त्यांचे सदैव स्मरण ठेवावे, तसेच इतरांच्या कल्याणासाठी कार्य करावे असे आवाहन यावेळी केले.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायतेसाठी स्वराज्य स्थापन केले, या लोकांना जीवनाचा खरा अर्थ समजला म्हणून ते किर्तीवंत झाले, त्यांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..

माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .

तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस