By : Sangharshkranti Team ,2026-01-25
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.25 जानेवारी 2026
(उज्वला उल्हारे)
आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या तांदळी दुमाला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिलांसाठी आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रमांच्या साक्षीने संपन्न झाला. या कार्यक्रमातून महिलांच्या सहभागातून ग्रामविकास अधिक बळकट होतो, असे प्रतिपादन नगराध्यक्षा मा. सुनीताताई संतोष खेतमाळीस यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी लोकनियुक्त सरपंच अनिताताई निगडे या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी मनीषा काळंगे यांनी केले.
यावेळी सार्वजनिक प्लास्टिकमुक्ती, बालविवाहमुक्त गाव याबाबत उपस्थित महिलांना शपथ देण्यात आली. तसेच आढळगाव पी.एस.सी. यांच्या वतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. समाजातील एकल महिलांचा सन्मान करण्यात येऊन सामाजिक भान जपण्यात आले.
कार्यक्रमात ओला-सुका कचरा व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व ग्रामस्थांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले. याशिवाय जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ऑक्सिजनचे महत्त्व, गाव विकास - एक उपाय या विषयावर श्रीगोंदा नगरपरिषद उपाध्यक्षा अलकाताई सुनील अनभुले (दरेकर) यांनी महिलांना विशेष मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, श्रीगोंदा गटविकास अधिकारी राणीताई फराटे, तसेच विस्तार अधिकारी सारिका हराळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमास नगराध्यक्षा सुनीताताई संतोष खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलकाताई सुनील अनभुले, गावचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे (अण्णा), उपसरपंच वैशालीताई संतोष हराळ, ग्रामपंचायत सदस्य सुनिता भोस, मंगलताई धालवडे, आशाबाई भोस, सारिका बोरुडे, वर्षा काळे-वाघ, झुंबर खुरांगे, रामदास गंगाधरे, श्रीकृष्ण धावडे, भरत शेळके, माजी उपसरपंच राजेंद्र भोस, नानासाहेब हराळ, व्हाईस चेअरमन हौसराव बोरुडे, माजी सरपंच निलेश शेठ शेळके, संचालक बापू शेळके, स्कूल कमिटी अध्यक्ष युवराज जाधव, उपाध्यक्ष नवनाथ भोस, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण भोस, ग्रामपंचायत माजी सदस्य, पत्रकार संपादक मेजर उल्हारे, पत्रकार उज्वला उल्हारे, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
महिलांच्या सहभागातून स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा कार्यक्रम तांदळी दुमाला ग्रामविकासाचा एक प्रेरणादायी आदर्श ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...
तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!
कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .
माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..
माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .
तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!
५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!
श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!
श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस