संतांनी देवाकडे समाजहिताचे व जनकल्याणाचे दान मागितले- शिवशाहीर ह.भ.प. विक्रम महाराज अवचिते

By : Sangharshkranti Team ,2026-01-26

संतांनी देवाकडे समाजहिताचे व जनकल्याणाचे  दान मागितले- शिवशाहीर ह.भ.प. विक्रम महाराज अवचिते

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.26 जानेवारी 2026

(उज्वला उल्हारे)

संत स्वतःसाठी कधी काही मागत नाहीत, जे काही मागतात ते इतरांच्या कल्याणासाठी मागतात. सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्याची ताकद संतांच्या विचारात आहे. आपण संतांकडे आपले दुःख सांगावे, ते आपल्याला मार्ग दाखवतात कारण इतरांचे कल्याण आणि समाजहिताचे कार्य करण्यासाठी संत निर्माण होतात, असे प्रतिपादन शिवशाहीर ह.भ.प. विक्रम महाराज अवचिते यांनी केले.

अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव परिसरात असलेल्या समर्थ नगर मोरया पार्क कॉलनी, येथे संत भगवान बाबा महाराज व संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहात शिवशाहीर विक्रम महाराज अवचिते यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.  

या परिसरातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार गुरुवर्य ह.भ.प. तुकाराम महाराज कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात, पहाटे काकडा भजन, ग्रंथराज शिवलीलामृत पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी वांबोरी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी साथीला होते. तीन दिवसीय महोत्सवात ह.भ.प. सुकन्या सानप महाराज, ह.भ.प. सुदर्शन महाराज शास्त्री, शिवशाहीर ह. भ.प. विक्रम महाराज अवचिते यांची कीर्तने झाली, तर काल्याचे किर्तन ह.भ.प. तुकाराम महाराज कातोरे यांनी केले. या सप्ताह प्रसंगी अहिल्यानगर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. कुमार भाऊ वाकळे, श्री. आकाश कातोरे, श्री. किसन भिंगारदिवे यांनी उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सागर शेठ, श्री. बबनराव गर्जे, श्री. कराड, श्री. सानप, श्री. प्रमोद गर्जे, श्री. अभिषेक मदने यांनी परिश्रम घेतले.  याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..

माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .

तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस