By : Sangharshkranti Team ,2026-01-26
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.26 जानेवारी 2026
(उज्वला उल्हारे)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय राष्ट्रध्वजवंदन व संचलन कार्यक्रमात सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.
भारताला जगातील सर्वोत्तम संविधान दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीच्या सर्व सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताकडे जागतिक पातळीवर एक महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जात आहे. हे सर्व आपल्या लोकशाही आणि संविधानामुळेच शक्य झाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी या भूमीला स्वाभिमान शिकवला. आज देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून महाराष्ट्र अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे. नुकतेच दावोस येथे करारामार्फत महाराष्ट्रात सुमारे ₹30 लाख कोटींची गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्र थांबणार नाही, तर पुढेच जात राहील, हे अधोरेखित झाले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीचे काम शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी शासन सातत्याने सकारात्मक भूमिका घेत आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. समाजातील वंचित घटकांसाठी विविध योजना राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शासन करत आहे.
निश्चितच येत्या काळात महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...
तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!
कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .
माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..
माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .
तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!
५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!
श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!
श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस