राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे अरणगाव येथे उत्साहात उद्घाटन!

By : Sangharshkranti Team ,2026-02-12

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे अरणगाव येथे उत्साहात उद्घाटन!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.12 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन आज उत्साहपूर्व वातावरणात पार पडले. हे शिबिर अरणगाव ,तालुका- जामखेड येथे दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीमध्ये आयोजित केलेले आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.सीताराम ससाणे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड) तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.ॲड.संजय पारे ( सरपंच, आरणगाव) श्री संतोष निगुडे (मा. सरपंच) श्री लहू शिंदे (सामाजिक कार्यकर्ते )श्री. अतुल सोनवणे (सामाजिक कार्यकर्ते ) श्री. अमोल दळवी (अध्यक्ष शाळा व्य.समिती), सदगुरू कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. रामदास बिटे आणि गावातील  नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व प्रतिमापूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात नॉट मी बट यु या NSS च्या ब्रीद वाक्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले त्यांनी ग्रामविकास स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतामध्ये  NSS स्वयंसेवकांना शिस्तप्रिय राहून आपली उन्नती कशी साधता येते याबाबत अनेक उदाहरण देऊन समजून सांगितले व कृषी शिक्षणाबरोबर समाजसेवेचा हा उपक्रम स्तुत्य वाटला. रा. से. यो. चे कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब पारखे सर यांनी शिबिराचा उद्देश आणि आगामी सात दिवसांतील उपक्रमांची माहिती दिली या शिबिरात स्वच्छता अभियान,  वृक्षारोपण,  जनजागृती रॅली, विविध विषयावरील व्याख्याने, आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, व NSS स्वयंसेवक,शिक्षक वृंद, उपस्थित होते.  डॉ. प्रियांका दहीवले व डॉ. प्रियांका जाधव यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सागर कारंडे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. तेजस गायकवाड यांनी केले.

शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...

तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .

माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..

माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .

तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!

५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!

श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!

श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !

आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!

श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!

श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!

आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज

सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस

शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस