By : Sangharshkranti Team ,2026-02-14
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.14 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखाना च्या २०२५-२६ या गळीत हंगामाचा समारोप मंगळवारी (दि. १०) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कारखान्याच्या गव्हाणीची विधिवत पूजा करून श्रीफळ व अखेरची उसाची मोळी गव्हाणीत टाकत यंदाच्या हंगामाची औपचारिक सांगता करण्यात आली.
कारखान्याचे संचालक लक्ष्मण रायकर, मारुती पाचपुते व ज्ञानदेव खरात यांच्या हस्ते हा समारंभ पार पडला. यावेळी अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी हंगामाचा आढावा घेत कारखान्याने आव्हानात्मक परिस्थितीतही उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगितले.
अध्यक्ष नागवडे म्हणाले की, विविध तांत्रिक व आर्थिक अडचणींवर मात करत यंदा कारखान्याने तब्बल ५ लाख ८० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. तसेच ६ लाख ६ हजार साखर पोती उत्पादित करण्यात आली असून, सरासरी १०.५० टक्के साखर उतारा मिळाला आहे. हा उतारा समाधानकारक असून, शेतकरी व कारखान्याच्या दृष्टीने सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कारखान्याच्या मशिनरीमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांमुळे दैनंदिन गाळप क्षमता वाढून साडेसहा ते सात हजार मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भविष्यात कमी कालावधीत अधिक गाळप करणे शक्य होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सभासद व ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मुकादम, मजूर, वाहतूकदार, ठेकेदार आणि कारखान्याचे कामगार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे अध्यक्षांनी नमूद केले. सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच हा हंगाम सुरळीत आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाला, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी संदीप औटी, संचालक भाऊसाहेब नेटके, शरदराव जगताप, विश्वनाथ गिरमकर, विठ्ठल जंगले, सावता हिरवे, बंडू जगताप, प्रा. सुरेश रसाळ, प्रवीण लबडे, दत्तात्रय कातोरे यांच्यासह कामगार युनियनचे अध्यक्ष रामभाऊ लबडे, मधुकर हिरवे, दीपक तारकुंडे, मुकादम धुलचंद राठोड, नामदेव राठोड, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक सुभाष शिंदे यांनी केले, तर श्रीनिवास घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यंदाचा हंगाम समाधानकारक ठरत कारखान्याच्या प्रगतीच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...
तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!
कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .
माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..
माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .
तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!
५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!
श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!
श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस