By : Sangharshkranti Team ,2026-02-15
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.15 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स या जागतिक परिषदेचे उदघाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, गेल्या दशकभरात कर्करोगाच्या घटनांमध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. भारतासारख्या देशाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असली, तरी सध्या कर्करोग हा आरोग्य व्यवस्थेसमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. ही समस्या केवळ भारतापर्यंत मर्यादित नसून जागतिक स्तरावरही तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळे केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदान यावरही विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
कोणताही आजार किंवा विकार सीमा ओळखत नाही, तो व्यक्तीची सामाजिक-आर्थिक स्थिती पाहत नाही. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे आणि सीमांच्या पलीकडे जाऊन उपाय शोधणे ही आपली जबाबदारी आहे. ही परिषद केवळ चर्चेसाठी मर्यादित नसून, व्यापक दृष्टीकोनातून विचार करण्याचे व्यासपीठ असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसारखी संस्था उभी राहिल्याने केवळ भारतातीलच नव्हे, तर विविध देशांमधील रुग्णांनाही उपचाराची सुविधा मिळत आहे. अशा अधिकाधिक संस्थांची देशाला गरज आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात महा कॅन्सर फाऊंडेशन ची स्थापना करण्यात आली असून या संस्थेमार्फत संपूर्ण राज्यात हब मॉडेलच्या आधारे कॅन्सर ग्रिड उभारली जात आहे, ज्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाला कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कर्करोग उपचाराच्या क्षेत्रात अधिक संशोधन, नवोन्मेष, मेडटेक, बायोटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा व्यापक वापर आवश्यक आहे. विशेषतः वेळेत निदान आणि प्रारंभिक टप्प्यातच कर्करोगावर प्रभावीपणे मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग व्हावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी एनसीआयचे अध्यक्ष सुनील मनोहर, एनसीआयचे सीईओ शैलेश जोगळेकर, एनसीआयचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...
तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!
कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .
माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..
माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .
तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!
५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!
श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!
श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस