१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

By : Sangharshkranti Team ,2026-04-04

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 4 एप्रिल 2026

(उज्वला उल्हारे)

शहर व परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून भटकत असलेल्या एका वृद्ध मनोरुग्ण महिलेला अखेर तिच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पोहोचवण्यात यश आले आहे. महिला व बालकल्याण सभापती श्रीमती मिराताई शिंदे यांच्या तत्परतेमुळे मानवतेचा आदर्श ठरलेली ही मदतकार्याची घटना घडली.

सदर वृद्ध महिला गेल्या अनेक दिवसांपासून श्रीगोंदा शहर तसेच आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांमध्ये भटकताना नागरिकांच्या नजरेस पडत होती. नऊवारी साडी परिधान केलेली आणि गळ्यात तुळशीची माळ असल्यामुळे त्या सुसंस्कृत कुटुंबातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. नागरिकांनी त्यांच्या ओळखीचा शोध घेण्यासाठी फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते; मात्र सुरुवातीला कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नव्हता.

दरम्यान, वडाळी रोड परिसरातील काही जागरूक नागरिकांनी शुक्रवारी सकाळी मिराताई शिंदे यांच्याशी संपर्क साधून संबंधित महिलेबाबत माहिती दिली. मिराताई शिंदे घटनास्थळी पोहोचल्या असता सदर आजी अत्यंत अशक्त अवस्थेत झोपलेल्या आढळून आल्या. नागरिकांनी त्यांना अन्न-पाणी दिले होते, परंतु त्यांच्या अंगात उठण्याइतकीही शक्ती उरलेली नव्हती.

परिस्थितीची गंभीरता ओळखून तात्काळ ॲम्बुलन्सला पाचारण करण्यात आले आणि संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करून सलाईन लावण्यात आले. या मदतकार्यामध्ये भरत काकडे आणि संतोष गोरखे यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

उपचारादरम्यान प्रेमाने विचारपूस केल्यानंतर वृद्ध महिला वेगवेगळ्या गावांची नावे सांगत होत्या. त्या धाग्यावरून विविध ठिकाणी चौकशी सुरू करण्यात आली. भांडगाव येथील ओळखीच्या व्यक्तीमार्फत पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला. विशेष म्हणजे, अवघ्या १५ मिनिटांत संबंधित महिलेच्या नातवाचा -कृष्णा गोरे -यांचा संपर्क साधण्यात यश आले.

दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कृष्णा गोरे श्रीगोंद्यात दाखल झाले. सदर महिलेचे नाव गंगा गोरे असून त्या माजलगाव तालुक्यातील वाघोरी येथील असल्याचे स्पष्ट झाले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गंगा गोरे यांना त्यांच्या नातवाकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आले.

चौकट - दरम्यान, या काळात विविध सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांशीही संपर्क साधण्यात आला होता. कोणतेही नातेवाईक पुढे आले नसते, तर संबंधित महिलेला संस्थेमध्ये दाखल करण्याची तयारी करण्यात आली होती.

या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना मिराताई शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले की, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तींशी सहानुभूतीने व प्रेमाने संवाद साधल्यास त्यांना योग्य मदत मिळू शकते. समाजातील प्रत्येकाने अशा गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्यास अनेकांचे जीवन सुरक्षित व सन्मानाने जगता येईल, असे त्यांनी नमूद केले.

मानवतेचा आदर्श ठरलेली ही घटना श्रीगोंदा शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!