घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

By : Sangharshkranti Team ,2026-06-22

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 22 जून 2026

(उज्वला उल्हारे)

श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे विविध प्रकार, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्तता याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. योगामुळे स्मरणशक्ती वाढते, मन एकाग्र राहते, शरीरातील विविध विकारांपासून मुक्ती मिळते तसेच मानसिक तणाव कमी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात योगाचार्यांनी विद्यार्थ्यांना पाठीवर झोपून केली जाणारी योगासने, पोटावर झोपून केली जाणारी आसने तसेच सूर्यनमस्काराचे महत्त्व आणि त्याची योग्य पद्धत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योगासने व सूर्यनमस्काराचा सराव केला.

यावेळी योगाचे प्रात्यक्षिक  कृष्णा तनपुरे व  वाल्मिक कोरडे यांनी करून दाखवले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व सांगताना, योगामुळे शरीर तंदुरुस्त राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, भूक सुधारते आणि प्रत्येक क्षेत्रात कार्यक्षमतेने काम करण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह व आत्मविश्वास निर्माण होतो, असे सांगितले.

चौकट - या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रविणकुमार लोंढे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी योगाच्या विविध प्रकारांचा मनापासून सराव करत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.

योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असून निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!