किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

By : Sangharshkranti Team ,2026-04-04

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 4 एप्रिल 2026

(उज्वला उल्हारे)

महाराष्ट्राचे  आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती, पुरस्कार वितरण, तसेच इतर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, तसेच रात्री राजसदरेवर अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबवी येथील शिवशाहीर विक्रम अवचिते निंबवीकर यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

या कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार मा. सुधांशु त्रिवेदी हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी ब्रिगेडियर संग्राम मोहिते, नागपूरचे मुधोजीराजे भोसले, दुर्ग अभ्यासक श्री आनंद पाळंदे, कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, श्री शिवाजी रायगड स्मारक समिती व शिवचरित्र साहित्य प्रकाशन समिती प्रमुख श्री सुधीरजी थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले मावळे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिवशाहीर विक्रम अवचिते यांनी आपल्या पहाडी आणि धारदार शैलीत पोवाडा आणि स्फूर्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.  शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा राजसदरेवर सन्मान करण्यात आला. 

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर राजसदरेवर आपली कला सादर करण्याची संधी मिळणे आणि सन्मान होणे हा माझ्या आयुष्यातील आणि शाहिरी क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असल्याची भावना शाहिरांनी व्यक्त केली.

चौकट-

या कार्यक्रम निमित्ताने निंबवी ग्रामस्थ, तसेच वारकरी आणि  विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ शाहीर दादा पासलकर, महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, मुंबई पोलीस उपायुक्त श्री. गणेश गावडे साहेब, श्री राहुल गावडे साहेब, डॉ. गोपालकृष्ण गावडे साहेब, उद्योजक श्री. अनिरुद्ध शिर्के साहेब, श्री. भास्कर गावडे साहेब, तसेच मित्रपरिवार यांचेकडून शिवशाहीर विक्रम अवचिते यांचे अभिनंदन करण्यात आले.


घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!