By : Sangharshkranti Team ,2026-06-07
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 7 जून 2026
(उज्वला उल्हारे)
येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मिरजगाव संचलित सदगुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर होते. यावेळी प्रशासकीय अधिकारी श्री. सखाराम राजळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सचिन आढाव, प्रा. डॉ. प्रियंका दहिवळे, डॉ. प्रियंका जाधव, प्रा. महेश कुतुवळ, प्रा. वैभव शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. बाळासाहेब पारखे, प्रा. तेजस गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षांचे महत्त्व, जलसंधारण, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकास या विषयांवर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
सदगुरु कृषी महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमातून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे मत प्रशासकीय अधिकारी श्री सखाराम राजळे सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी केले तर आभार डॉ. उके यांनी मानले.
घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते
एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!
सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे
पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!
जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!