By : Sangharshkranti Team ,2026-05-29
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.29 मे 2026
(उज्वला उल्हारे)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे राज्यस्तरीय भव्य आणि नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शासनाच्या वतीने शासकीय इतमामात हा जयंती सोहळा साजरा केला जाणार असल्याची माहिती विधान परिषदेचे अध्यक्ष तथा जयंती उत्सवाचे स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले की, ६ मे २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे आयोजित कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत चोंडी विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३६० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, आणखी ६८१ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच जलसंधारण विभागाचेही प्रस्ताव शासनाकडे दाखल आहेत. एकंदरीत १२०० कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आला असून, आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया प्रसिद्ध होऊ शकलेली नसली तरी शासनस्तरावरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यंदाचा जयंती सोहळा दोन दिवसांचा असून, विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांनी तो सजणार आहे. आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून आकर्षक रोषणाई व दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे.
तसेच ३० मे रोजी रात्री ७.३० ते १० या वेळेत प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या उपस्थितीत भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री ११ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित भव्य ड्रोन शो सादर करण्यात येणार असून, आकाशातून त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास नागरिकांना अनुभवता येणार आहे. रात्री १२ वाजता आकर्षक फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येणार आहे.
चौकट - ३१ मे रोजी पहाटे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्येश्वर मंदिरात अभिषेक, यथासांग पूजा व धार्मिक विधी पार पडणार आहेत.
या भव्य जयंती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री दत्तामामा भरणे, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, धनगर समाजातील माजी आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सांगितले.
हा ऐतिहासिक आणि नेत्रदीपक जयंती सोहळा अनुभवण्यासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही सभापती तथा स्वागताध्यक्ष प्रा.राम शिंदे यांनी केले.
घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते
एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!
सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे
पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!
जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!