By : Sangharshkranti Team ,2026-06-07
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 7 जून 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा : सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेला केंद्रस्थानी ठेवून विश्वास, पारदर्शकता आणि समाजाभिमुख कार्याच्या बळावर आर्थिक क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या वृद्धेश्वर मल्टीस्टेटच्या श्रीगोंदा शाखेने १३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा प्रिंट & इलेक्ट्रॉनिक मिडिया, महाराष्ट्र राज्यच्या वतीने संस्थेला मनःपूर्वक शुभेच्छा देऊन श्रीगोंदा शाखेच्या चेअरमन सायली वाडगे व वृद्धेश्वर मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघर्षनामा माध्यम समूहाचे मुख्य संपादक मेजर भिमराव उल्हारे आणि पत्रकार उज्वला उल्हारे यांनी संस्थेच्या उल्लेखनीय वाटचालीचा गौरव करत भावी प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना मेजर भिमराव उल्हारे यांनी सांगितले की, आर्थिक क्षेत्रात विश्वास हीच सर्वात मोठी भांडवल असते. वृद्धेश्वर मल्टीस्टेटने गेल्या तेरा वर्षांच्या कालावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन करत केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता समाजहिताची जपणूक करणारे कार्य केले आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला बचत गट, लघुउद्योजक आणि कष्टकरी वर्गाला आर्थिक बळकटी देण्यासाठी संस्थेने केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.
पत्रकार उज्वला उल्हारे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची जाणीव निर्माण करण्यामध्ये वृद्धेश्वर मल्टीस्टेटने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ग्राहकांच्या विश्वासाला सर्वोच्च स्थान देत संस्थेने पारदर्शक कारभारातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आगामी काळात "वृद्धेश्वर" हे नाव घराघरात आर्थिक संचय, सुरक्षित गुंतवणूक आणि आर्थिक स्वावलंबनाचे प्रतीक बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, एखाद्या संस्थेची खरी ताकद तिच्या ग्राहकांचा विश्वास, सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमध्ये असते. वृद्धेश्वर मल्टीस्टेटने या तिन्ही बाबींचा समतोल साधत यशस्वी वाटचाल केली असून भविष्यातही ही संस्था आर्थिक क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपस्थित पत्रकारांनीही श्रीगोंदा संस्थेच्या तेरा वर्षांच्या यशस्वी प्रवासाचे अभिनंदन केले. समाजातील विविध घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत राहो आणि आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत प्रगतीच्या नव्या शिखरांवर पोहोचो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
चौकट- या प्रसंगी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव बनसुडे, दक्ष चे संपादक दत्ताजी जगताप, व्हाईस ऑफ मिडियाचे तालूका अध्यक्ष सुहास कुलकर्णी,लोकक्रांती न्युजचे संपादक किशोर मचे, शकीलभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी वृद्धेश्वर मल्टीस्टेटच्या कार्याचा गौरव करत संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वृद्धेश्वर मल्टीस्टेट च्या श्रीगोंदा शाखेने गेल्या तेरा वर्षांत ग्राहककेंद्री सेवा, आर्थिक शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यांच्या बळावर निर्माण केलेला विश्वास भविष्यात अधिक दृढ होईल आणि संस्था आर्थिक समृद्धीचा दीपस्तंभ म्हणून राज्यभर आपली ओळख निर्माण करेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते
एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!
सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे
पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!
जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!