श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

By : Sangharshkranti Team ,2026-06-15

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 15 जून 2026

(उज्वला उल्हारे)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र चौंडी येथे आयोजित करण्यात आलेला लेक-जावई धोंडे जेवणाचा ऐतिहासिक सोहळा अत्यंत उत्साहात, जल्लोषपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभिनव उपक्रमाने चौंडीच्या सांस्कृतिक परंपरेला नवे वैभव प्राप्त करून दिले.

राज्याच्या विविध भागांतून तसेच दूरदूरच्या शहरांतून आलेल्या चौंडीच्या लेकी आणि जावयांच्या आगमनाने संपूर्ण गाव उत्सवमय झाले होते. गावातील रस्ते, चौक आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, त्यांच्या सौभाग्यवती आशाताई राम शिंदे तसेच ग्रामस्थांनी लेकी-जावयांचे उत्स्फूर्त स्वागत केले. स्वागतावेळी अनेक लेकींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर माहेरच्या प्रेमाने भारावलेल्या जावयांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता.

कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात आलेल्या अहिल्येच्या लेकी गहिवरल्या... सावरल्या... या भावस्पर्शी गीताने वातावरण अधिकच भारावून गेले. गीताच्या सुरावटींनी माहेरच्या आठवणी जाग्या झाल्याने अनेक लेकी भावूक झाल्या. गावकऱ्यांनी दिलेल्या सन्मानाने आणि प्रेमाने जावयांची छाती अभिमानाने फुगल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. सरपंच पांडूरंग उबाळे यांनी केले. यावेळी मा. सरपंच अशोक दादा देवकर, मा. सरपंच अभिमान सोनवणे, उपसरपंच गणेश उबाळे,संजय जगदाळे सर, सोसायटी अध्यक्षा वत्सलाताई भाडवलकर, व्हाईस चेअरमन दिनेश शिंदे, शशिकांत देवकर, गुलाब शेख, विशाल भाडवलकर, प्रा. बाळासाहेब सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ, मान्यवर आणि लेकी-जावई मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी सरपंच पांडुरंग उबाळे यांनी प्रास्ताविक केले तसेच मा .सरपंच अशोक दादा देवकर, अभिमान सोनवणे तसेच लेकींच्या वतीने उषाताई लोखंडे/ खरात यांनी मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. चौंडी गावाने लेकी-जावयांचा सन्मान करून सामाजिक आणि कौटुंबिक मूल्ये जपल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

आपल्या मनोगतात विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, लेकीचे गाव म्हणून चौंडीची ओळख देशाच्या नकाशावर अधिक ठळकपणे निर्माण होत आहे. स्वतःच्या लेकी-जावयांचा सन्मान करण्याबरोबरच संपूर्ण गावातील लेकी-जावयांचा सन्मान करण्याचा आनंद आज मिळाला आहे. हे सर्व पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कृपेने शक्य झाले आहे.

ते पुढे म्हणाले, चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन गावाच्या विकासासाठी तब्बल १२oo कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे चौंडीचे भवितव्य आणखी उज्ज्वल होणार आहे. चौंडीच्या लेकी जिथे जातात तिथे त्या आपल्या गावाचे, कुटुंबाचे आणि आई-वडिलांचे नाव मोठे करतात, ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त चौंडीच्या सर्व लेकी गावात परत आल्या की, जणू अहिल्यादेवींचेच आगमन झाल्याचा आनंद वाटतो.

चौकट - अधिक मासाच्या पावन पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. उपस्थित सर्वांनी पारंपरिक धोंडे जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला. त्यानंतर किमान ७०० लेकी आणि जावयांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान सोहळ्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात लेकी-जावयांचे स्वागत करत कौटुंबिक नात्यांचा अनोखा उत्सव साजरा केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. चौंडी गावाच्या एकोप्याचे, संस्कृतीचे आणि लेकींप्रती असलेल्या प्रेमाचे दर्शन घडविणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात कायमचा घर करून गेला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा लेक-जावई धोंडे जेवणाचा नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळा चौंडीच्या सामाजिक व सांस्कृतिक  एक संस्मरणीय पर्व ठरला असून, ग्रामीण संस्कृती, कुटुंबव्यवस्था आणि लेकींच्या सन्मानाचा आदर्श राज्यभर पोहोचवणारा प्रेरणादायी उपक्रम म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे.

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!