विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

By : Sangharshkranti Team ,2026-06-15

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 15 जून 2026

(उज्वला उल्हारे)

ग्रामीण भागातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी राघव फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास परीक्रमा इन्स्टिट्यूट (संकुल)चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा युवा नेते प्रतापसिंह बबनराव पाचपुते यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रतापसिंह पाचपुते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, जिद्द आणि सातत्य यांच्या जोरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य दिशा, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रणजीत गुरव उपस्थित होते. तसेच बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश आण्णासाहेब शेलार, डॉ. विजय मैड, डॉ. गणेश विजय मैड, डॉ. स्वाती गणेश मैड, राघव फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर जाधव आणि युवा उद्योजक चेतनकुमार शर्मा यांची विशेष उपस्थिती लाभली.

याप्रसंगी समता पतसंस्थेचे चेअरमन सुनील ढवळे, व्हाईस चेअरमन आश्रुद्दीन शेख, एम. आर. पवार, प्राचार्य तथा नगरसेवक राजेंद्र खेडकर, नानाभाऊ हिरवे, तुकाराम वैद्य, ग्रामपंचायत सदस्य संतोष शेलार, कैलास राऊत, लोखंडे सर, शरद इथापे, दीपक धनवडे, महेश राजेभोसले यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राघव फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या, पेन, शैक्षणिक साहित्य आणि अभ्यासासाठी आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

चौकट -यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व असून समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन शिक्षणाला बळ देण्याचा हा स्तुत्य प्रयत्न असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी राघव फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि शिक्षणाविषयी निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून, भविष्यातही अशा शैक्षणिक उपक्रमांची गरज असल्याचे मत कार्यक्रमाच्या शेवटी व्यक्त करण्यात आले.

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!