By : Sangharshkranti Team ,2026-06-15
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 15 जून 2026
(उज्वला उल्हारे)
वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या एमबीबीएस परीक्षेत यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या होतकरू विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ॲड रमेश सदाशिव जठार यांची कन्या कु.शिवानी रमेश जठार हिने बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथे व श्री दीपक रामदास शिंदे पूर्वा केम टेक प्रायव्हेट लिमिटेड डिव्हिजनल मॅनेजर यांची कन्या कु.अदिती दीपक शिंदे हिने एसएमबीटी कॉलेज नाशिक येथे एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीने.एमबीबीएस या कठीण अभ्यासक्रमात यश मिळवून आपल्या कुटुंबासह श्रीगोंदा तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यासाठी राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेने पुढाकार घेतला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन व शाल परिधान करून विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रकाश निंभोरे, व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोर, संचालक माधव बनसोडे, ॲड. रमेश जठार तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांच्या भावी वैद्यकीय सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी उपस्थितांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून त्यांनी समाजसेवेची भावना जपत आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
चौकट - कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थिनींचे कुटुंबीय उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना विद्यार्थिनींनी मिळालेल्या सन्मानाबद्दल राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेचे आभार मानले व भविष्यात प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.
छायाचित्र : एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करताना मान्यवर.
घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते
एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!
सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे
पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!
जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!