By : Sangharshkranti Team ,2026-06-07
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 7 जून 2026
(उज्वला उल्हारे)
जामखेड : अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड तालुक्यात मोठी कारवाई करत अवैधरित्या देशी व विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल ४२ हजार ५०० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग तसेच पोलीस अंमलदार संतोष साबळे व शामसुंदर जाधव यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.
सदर पथक जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती संकलित करण्यासाठी गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती प्राप्त झाली. अरणगाव शिवारातील साई हॉटेल येथे एक व्यक्ती बेकायदेशीरपणे देशी व विदेशी मद्याची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.
चौकट - छाप्यामध्ये रविकांत दत्तात्रय भोगे (वय ४१), रा. अरणगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून विविध प्रकारच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या असा एकूण ४२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, जुगार, मटका व इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहीम सुरू ठेवली असून अशा कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते
एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!
सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे
पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!
जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!