By : Sangharshkranti Team ,2026-05-07
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 7 मे 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्यासाठी तब्बल १ कोटी ५८ लाख १३ हजार ४५८ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. या निर्णयामुळे श्रीगोंदा तालुक्यातील हजारो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या शेतकरी भवनात शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. बाजार समितीतील कामकाज अधिक सुलभ आणि शेतकरीहिताचे करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
आमदार विक्रमदादा पाचपुते यांनीही शेतकरी हितासाठी भविष्यात आणखी विकासकामे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
तालुक्यातील शेतकरी, व्यापारी व बाजार समिती परिसरातील नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत असून, शेतकऱ्यांसाठी हक्काचे निवारा केंद्र म्हणून या भवनाकडे पाहिले जात आहे.
चौकट - ही मंजुरी राज्याचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते बबनदादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळाल्याचे सांगितले जात आहे.
शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार, या शेतकरी भवनामुळे बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्कामासाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत. शेतीमाल विक्रीसाठी दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रभर थांबण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्या भवनामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते
एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!
सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे
पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!
जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!