श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By : Sangharshkranti Team ,2026-06-01

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 1 जून 2026

(उज्वला उल्हारे)

चोंडी ,अहिल्यानगर :- कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या, स्त्रीशक्तीचे प्रतीक आणि लोककल्याणकारी शासनव्यवस्थेचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविक, नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीने चोंडी नगरी भक्तिमय व उत्सवी वातावरणाने न्हाऊन निघाली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्तामामा भरणे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, अहिल्यादेवी या त्याग, कर्तृत्व, स्त्रीशक्ती आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे जिवंत प्रतीक आहेत. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकार चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. चोंडी हे केवळ ऐतिहासिक स्थळ नसून संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहे. त्यामुळे येथील विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, खासदार रामराव वडकुते, आमदार सुरेश धस, माजी आमदार गोपीचंद पडळकर, मोनिका राजळे, नारायण पाटील, बाबासाहेब देशमुख, उत्तम जानकर, सचिन कांबळे, काशिनाथ दाते, अक्षय कर्डिले, अमोल खताळ, माजी आमदार रामहरी रुपनवर, पोपटराव गावडे, स्नेहलता कोल्हे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना येत्या आठ ते दहा दिवसांत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे." तसेच चोंडीच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या सुमारे १२०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी वेगाने करण्यात येणार असून या माध्यमातून पर्यटन, धार्मिक, सांस्कृतिक आणि पायाभूत सुविधांचा व्यापक विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या मनोगतात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, देशभरातील धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धारामध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक समता आणि लोककल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट निर्मितीबाबत शासन सकारात्मक विचार करत असून यामुळे नव्या पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

चौकट - विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी स्वागतपर भाषणात चोंडी विकास आराखड्याची सविस्तर माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाचे चोंडीच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे. १२०० कोटी रुपयांहून अधिक निधीच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली असून त्यातून चोंडीच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार आहे. अहिल्यादेवींच्या विचारांचे जागतिक स्तरावर संवर्धन करण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, अभिवादन सोहळे आणि सामाजिक उपक्रम यावेळी आयोजित करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी अहिल्यादेवींच्या स्मारकास अभिवादन करून त्यांच्या कार्याला मानवंदना दिली.

अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा, आदर्श प्रशासनाचा आणि लोककल्याणकारी कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारा हा राज्यस्तरीय सोहळा चोंडीच्या इतिहासातील अविस्मरणीय ठरला.

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!