श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

By : Sangharshkranti Team ,2026-04-04

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 4 एप्रिल 2026

(उज्वला उल्हारे)

सावरगाव ता. आष्टी, जि. बीड येथे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह श्री नवनाथ महाराज ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ ते शानिवार दि . १८ एप्रिल २०२६ या दरम्यान करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होण्याची तयारी सुरू आहे. श्री नवनाथ मंदिर मठ, भुगांव ता . मुळशी जि .पूणे व सावरगाव येथे वैकुंठवासी ब्र भू . रघुनाथ महाराज उंबरेकर ,वैकुंठवासी गुरुवर्य सावजीबाबा यांच्या आशीर्वादाने ह भ प वसंत भाऊ शेंडगे यांचे प्रेरणेने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सप्ताह सोहळा गर्भगिरी पर्वत श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव ता .आष्टी जि .बीड येथे उत्साहात पार पडणार आहे.

या धार्मिक सोहळ्याला विविध मान्यवर संत, कीर्तनकार व प्रवचनकार यांची उपस्थिती लाभणार असून, आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ९ ते ११नवनाथ ग्रंथ पारायण  व सकाळी ११ ते दुपारी २ विश्रांती भोजन संगीत दुपारी ४ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ सायंकाळी ६ ते ७ मच्छिंद्रनाथ आरती रात्री ७ ते ९  कीर्तन सेवा होणार रात्री ९ वा महाप्रसाद रात्री भक्तांसाठी नामस्मरण, हरीजागर भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचा अनमोल लाभ मिळणार आहे.

प्रमुख कीर्तन सेवा :-सप्ताहादरम्यान ह.भ.प. विविध महाराजांचे प्रवचन व कीर्तन आयोजित करण्यात आले असून, यात ह.भ.प. श्री म्हातारदेव महाराज आठरे, ह.भ.प. श्री मोरेश्वर महाराज मोरे, ह.भ.प. श्री दिपकनाथ महाराज (नवनाथ कथाकार), ह.भ.प. श्री भागवत महाराज उंबरेकर, ह.भ.प. श्री एकनाथ महाराज राजुरकर, ह.भ.प. श्री भगवान महाराज नाटकरे, तसेच ह.भ.प. श्री राऊत दादा महाराज  व ह.भ.प. श्री गणेश महाराज कार्ले यांची होणार आहे.

शनिवार, दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. बंकट महाराज ढवळे सिद्धटेक यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे .

या सप्ताहात विविध गावांतील भजन मंडळे, महिला भजन मंडळे तसेच युवक मंडळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात नामस्मरणाचा गजर घुमणार असून भक्तीमय वातावरण अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट, सावरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. नवनाथ मंदिर मठ, समस्त ग्रामस्थ भुगांव व सावरगाव, तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू आहे.

या सप्ताह सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक आमदार सुरेश आण्णा धस ,ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पठारे हे असणार आहेत .

चौकट- या सप्ताहासंदर्भात अधिक माहितीसाठी आयोजकांनी संपर्क क्रमांक मो .७७९८७५ ००७५ / ९४२३११६२१४ उपलब्ध करून दिले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामसप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री नवनाथ महाराज मठ समस्त ग्रामस्थ भुगांव, श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान विश्वस्त मंडळ ग्रामस्थ मंडळ सावरगाव यांचेकडून करण्यात आले आहे.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सावरगाव परिसरात भक्ती, श्रद्धा आणि एकात्मतेचे सुंदर दर्शन घडणार असून, हा सोहळा आध्यात्मिक उन्नतीचा महत्त्वाचा पर्व ठरणार आहे.

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!