वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

By : Sangharshkranti Team ,2026-06-07

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 7 जून 2026

(उज्वला उल्हारे)

 सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य देत विश्वास, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी जपणारी वृद्धेश्वर मल्टीस्टेट ही संस्था आज आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ म्हणून उदयास आली आहे. संस्थेच्या श्रीगोंदा शाखेच्या  १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आर्थिक सुरक्षा व ग्राहक जागृती मेळावा तसेच शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला ग्राहक, सभासद, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक देशपांडे इन्व्हेस्टमेंट चे राजेश देशपांडे यांनी सुरक्षित पतधोरण ठेवी ,विश्वासार्ह गुंतवणूक आणि पारदर्शी व्यवस्थापन यावर ग्राहकांच्या पैसा सुरक्षित असून याबाबत वृद्धेश्वर मल्टीस्टेट चे काम दैदीप्यमान असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना श्रीगोंदा शाखेच्या चेअरमन सायली वाडगे यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गुंतवणुकीची सुरक्षा ही संस्थेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ग्राहकांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास आणि त्यांची आर्थिक सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी वृद्धेश्वर मल्टीस्टेट सातत्याने जबाबदारीने कार्यरत आहे. आर्थिक साक्षरता आणि योग्य गुंतवणुकीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

संस्थेच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना गावडे यांनी वृद्धेश्वर मल्टीस्टेटच्या पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यामुळे गुंतवणूकदारांचा संस्थेवर अटळ विश्वास निर्माण झाला असल्याचे सांगितले. ग्राहकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून संस्था आर्थिक सेवा पुरवत असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात संस्थेशी जोडले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव गाडगे यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नांतून उभी राहिलेली ही संस्था आज हजारो ग्राहकांच्या विश्वासाचे केंद्र बनली आहे. सर्वसामान्यांच्या सहभागातून आणि सहकार्यामुळे संस्थेने आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे ग्राहकांच्या आर्थिक सुबत्तेत भर घातली आहे.

यावेळी श्रीगोंदा च्या नगराध्यक्षा सुनीताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलकाताई अनभुले, नगरसेविका चांदणी खेतमाळीस, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, आमीन भाई शेख ,अँड . सुशील कुमार शिंदे तसेच दादा औटी माजी नगरसेवक सतीश मखरे आदी मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या .

या अनुषंगाने गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

चौकट - वृद्धेश्वर मल्टीस्टेटने महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ, स्वावलंबनाच्या संधी आणि व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्यात संस्थेने पुढाकार घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी हक्काची आर्थिक मदत, व्यवसायासाठी भांडवल उपलब्धता आणि विकासाच्या संधी निर्माण करण्याचे कार्यही सातत्याने सुरू ठेवले आहे.

ग्रामीण भागातील महिला बचत गट, उद्योजक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वृद्धेश्वर मल्टीस्टेट हे हक्काचे आर्थिक व्यासपीठ ठरत असून आर्थिक उन्नतीचे प्रभावी माध्यम म्हणून संस्थेची ओळख निर्माण झाली आहे. ग्राहकांच्या आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवून संस्थेने समाजाभिमुख कार्याचा आदर्श निर्माण केला आहे.

दरम्यान, वृद्धेश्वर मल्टीस्टेटच्या श्रीगोंदा शाखेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वृद्धेश्वर मल्टीस्टेटची विश्वासार्ह सेवा, ग्राहककेंद्री धोरणे आणि सामाजिक बांधिलकी यामुळे संस्था आगामी काळातही आर्थिक विकास आणि समाजकल्याणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!