श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान,सावरगाव येथे १४ ते१९ मार्चला नाथसंजीवन समाधी महोत्सव २०२६ चे आयोजन!

By : Sangharshkranti Team ,2026-03-07

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान,सावरगाव येथे १४ ते१९ मार्चला नाथसंजीवन समाधी महोत्सव २०२६ चे आयोजन!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.7 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

सावरगाव ता .आष्टी जि .बीड (मायंबा )येथे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान, सावरगाव येथे नाथ संजीवन समाधी महोत्सव २०२६ मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. हा महोत्सव १४ मार्च ते १९ मार्च २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार असून राज्यासह विविध भागांतून हजारो नाथभक्त सहभागी होणार आहेत.

महोत्सवाची सुरुवात १४ मार्च रोजी सकाळी ७ वाजता होणार असून श्री मच्छिंद्रनाथ गडावरून निशाण पैठणकडे प्रस्थान करण्यात येईल. त्यानंतर १६ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पैठण येथे निशाण मिरवणूक काढण्यात येणार आहे.

१८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता श्री मच्छिंद्रनाथ गडावर कावडीचे आगमन होईल. त्याच दिवशी दुपारी १२ वाजता महाआरती होणार असून दुपारी १.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नाथभक्तांनी पैठण, काशी व इतर तीर्थक्षेत्रांमधून कावडीने आणलेल्या पवित्र गंगाजलाने समाधीस्थळी जलाभिषेक करण्यात येणार आहे.

त्यानंतर सायंकाळी ४ वाजल्यापासून ते १९ मार्च पहाटे ५.३० वाजेपर्यंत समाधीस्थळी उटी, सुगंधी मसाले व चंदन उटी लेप लावण्याचा विशेष धार्मिक कार्यक्रम होणार आहे.

१९ मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता श्री मच्छिंद्रनाथ समाधीची विधिवत महापूजा पार पडेल. त्यानंतर पहाटे ६ वाजता महाआरती होऊन भाविकांसाठी नियमित दर्शन सुरू केले जाईल.

या महोत्सवानिमित्त भाविकांसाठी व्हीआयपी पासेसचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच “आपला एक दगड नाथ मंदिरासाठी” या मोहिमेअंतर्गत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने देणगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व विश्वस्त तसेच सावरगाव व शेंडगेवाडी येथील ग्रामस्थ यांनी केले आहे.

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व नाथभक्तांना या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचे दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महोत्सवादरम्यान भाविकांनी स्वच्छता, शांतता व शिस्त राखून देवस्थानच्या सूचनांचे पालन करावे, असेही विश्वस्त मंडळाने नमूद केले आहे.

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!