महात्मा फुले नूतन महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व व हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन!

By : Sangharshkranti Team ,2026-03-07

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व व हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.7 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

मिरजगाव :- येथील रुरल एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले नूतन महाविद्यालयात दिनांक ८ मार्च 2026 रोजी कै. सुशील चेडे स्मृती करंडक खुल्या राज्यस्तरीय पासिंग हॉलीबॉल ( पुरुष ) स्पर्धेचे आयोजन केले आहे. तर दिनांक 10 मार्च 2026 रोजी कर्मयोगी डॉ. ए. बी. चेडे करंडक राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी जाधव यांनी दिली.

       सन 1972 मध्ये मा. डॉ. ए. बी. चेडे यांनी रुरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 55 वर्ष संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कारक्षम पिढी घडवण्याच्या दृष्टीने मोलाचे योगदान देत आहे. कर्मयोगी डॉ. ए. बी. चेडे यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यातून प्रेरित होऊन सदर स्पर्धा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी संवाद कौशल्य व सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, वक्तृत्व कला विकसित व्हावी, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयावर चिंतन व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, आत्मविश्वास व धाडस निर्माण व्हावे, या हेतूने व शैक्षणिक वर्ष 2025 - 26 हे महाविद्यालयाचे रोप्य महोत्सवी वर्ष आहे, यानिमित्ताने सदर स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

मिरजगाव पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या दोन्ही स्पर्धेचा लाभ घ्यावा. असे आवाहन रुरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कर्मयोगी डॉ. ए. बी. चेडे यांनी व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!