By : Sangharshkranti Team ,2026-03-19
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 19 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
श्री क्षेत्र रांधे नगरी येथे सर्व दुरवरून स्वामी भक्त श्री क्षेत्र अक्कलकोट ला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जातात , तद्वतच श्री क्षेत्र रांधे नगरीत ही भाविक भक्त मोठ्या संख्येने नतमस्तक होत दर्शन घेण्यासाठी येतात , असे गौरवोदगार प्रसिद्ध किर्तनकार हभप अशोक महाराज शिंदे यांनी काढले .
श्रीक्षेत्र रांधे नगरीत श्री स्वामी समर्थ देवस्थान च्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वामी कथेचे ३ रे पुष्प गुंफताना हभप अशोक महाराज शिंदे पुढे म्हणाले की ,अक्कल असलेले कोट , ते अक्कलकोट होय . शत्रुला कपटाने , मित्राला प्रेमाला , संसाराला पैश्याने जिंकता येते , स्वामीं ची सेवा केल्याने च देव भेटतो . संतांच्या संगतीत आल्यावरच देव भेटतो . प्रत्येकाच्या अंर्तमनात काय चालले आहे , ते स्वामींना कळते . देवस्थान चे संस्थापक अनिलराव आवारींना स्वामींचा साक्षात्कार झाला म्हणून हा स्वामी कथेचा कार्यक्रम संपन्न होत आहे . जसे वारकरी ज्ञानोबा तुकोबा साठी पंढरी च्या विठोबा ला भेटण्यासाठी पंढरपूर ला जातात , तद्वत रांधे येथील सेवेकरी अक्कलकोट ला वारीने जाणार आहेत . शेतकरी नसेल तर , शेतकरी राजा आहे . आई कोणाला ही म्हणत नाही , जिने आयुष्य जगाच्या कल्याणा करिता आपल्या लेकरांना पदरात घेते , ती आई होय . ज्याची आई सोडून गेली , त्याला आईचे महत्व विचारा . ज्यांची आई गेली , त्यांनी स्वामींकडे या , त्यांना आई माना . असेच एक जगाची माऊली म्हणजे ज्ञानोबा माऊली होय तशीच अक्कलकोट चे श्री स्वामी समर्थ माऊली होय . ज्ञानोबा रायांना ही जगाने खूप त्रास दिला . सात्विक अंतकरणाचा भाव असेल , तरच आपण स्वामी पर्यंत पोहचतो . स्वामींचे देणे सोपे नाही , ते देण्यासाठी येतात . तुम्ही आता स्वामींसाठी येता ना , स्वामी ही तुमच्यासाठी येतील . गुरु पारायणा साठी सर्वांनी आले पाहिजे.गुरूं ब्रम्ह , गुरुं विष्णू , परब्रम्ह.भक्त आल्यावर स्वामींना आनंद होत असेल .
लोकं मोठमोठ्या भारी गाड्या घेऊन स्वामींच्या दर्शनाला जातात आणि फार काम असल्याचा , वेळ नसल्याचा आव आणत , दर्शनासाठी पुजाऱ्यांना पैसे देऊन दर्शन घेतात . गरीबी कधी कोणावर येईल ते सांगता येत नाही , काहींना श्रीमंतींचा गर्व असतो , पण माज करू नका , सत्ता , संपत्ती प्रारब्धात असेल तरच मिळते . कोणत्या रूपाने साधू , संत , देव येतील , ते आपल्याला कळणार ही नाही . जसे अक्कलकोट ला जसे भक्त दर्शनासाठी जातात , तसेच रांधे येथे भाविक मोठ्या संख्येने येतात . आळस नको आहे , स्वामी आपल्या मागे पुढे कायम उभे राहतील .
चौकट -
जोरी बंधूंनी अतिशय उत्कृष्ठ पणे मंदीर परिसर व स्टेज वर डेकोरेशन केले , तर टाळकरी , गायक यांनी अत्यंत सुत्र बद्द रित्या नियोजन केल्याने या कार्यक्रमाला मोठे भक्तीमय स्वरूप आले .
चौकट -
आजच्या या स्वामी कथेच्या ३ ऱ्या पुष्पाच्या वेळी भजनात महिला व पुरुष भाविक भक्त अक्षरशः तल्लीन होत मनसोक्त टाळ्या वाजवून , नाचत , गात होते , या कथेमुळे संपूर्ण श्री क्षेत्र रांधे नगरी स्वामीमय झाल्याचे यावेळी दिसून आले .
घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते
एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!
सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे
पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!
जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!