गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त अर्थात हिंदू नववर्षानिमित्त कोल्हार भगवतीपूर गावातील सर्व मंदिरांवरील" />
By : Sangharshkranti Team ,2026-03-19 संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा दि. 19 मार्च 2026 (उज्वला उल्हारे) गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त अर्थात हिंदू नववर्षानिमित्त कोल्हार भगवतीपूर गावातील सर्व मंदिरांवरील जुने ध्वज बदलवून त्याजागी नवीन भगवे ध्वज उभारण्यात आले. दरवर्षी उत्साहात हा उपक्रम राबविला जातो. हाती भगवे ध्वज घेत सनई चौघड्यांच्या स्वरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा परिधान करीत ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले. हिंदू नववर्ष स्वागत समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीफळ वाढवून ध्वज बदलविण्यास प्रारंभ झाला. मिरवणुकीत डोक्यावर भगव्या टोप्या परिधान करून पारंपरिक वेशभूषा केलेले ग्रामस्थ व तरुण हाती भगवे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होते. छत्रपती चौक, भगवतीदेवी कमान, तालीम, भगवतीदेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, श्रीराम मंदिर, गणपती मंदिर, गुरुदेव दत्त मंदिर, हनुमान मंदिर, खंडोबा मंदिर, मुनिसुव्रतस्वामी मंदिर, महादेव मंदिर, शनी मंदिर, सप्तशृंगी मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मुंजोबा मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, विश्वकर्मा मंदिर, बिरोबा मंदिर, पाटीलबा मंदिर, कानिफनाथ मंदिर आदी मंदिरांवर नूतन भगवे ध्वज उभारण्यात आले. मिरवणुकीची सांगता स्व. माधवराव खर्डे चौकात झाली. यावेळी चौकात भगवा ध्वज उभारून डॉ सुनील खर्डे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थांना हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत जागतिक घडामोडींमुळे वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत युद्धजन्य परिस्थिती लवकर संपून सर्वसामान्यांचे जीवन सुरळीत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शामराव गोसावी यांनी यावेळी हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देत वडगावपान येथील १२ वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. यावेळी भगवतीपूर पोलीस पाटील सुखलाल खर्डे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शामराव गोसावी, पत्रकार सुहास वैद्य, रंभाजी बोरुडे, व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अतुल रांका, शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष अमोल खर्डे, सोन्याबापू मोरे सर, मयुर बंग, राहुल भावसार, प्रसाद दळवी, भाजपा तालुका उपाध्यक्ष अक्षय मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे विश्वस्त व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित मोरे व बालरोगतज्ञ डॉ. सुनील खर्डे यांच्या पुढाकारातून हिंदू नववर्ष स्वागत समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास वैद्य यांनी केले.कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!
घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते
एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!
सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे
पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!
जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!