By : Sangharshkranti Team ,2026-03-24
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 24 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
शहरातील महात्मा फुले उद्यान परिसरात महिला व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने श्रीगोंदा शहरात संतापाची लाट उसळली असून, आज संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांनी एकत्र येत थेट श्रीगोंदा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिस प्रशासनाला जाब विचारला.
मोर्चादरम्यान नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींवर नेमकी काय कारवाई होणार?, शहरात वाढत्या खोट्या गुन्ह्यांना आळा कसा बसवणार? असे थेट सवाल उपस्थित केले. संबंधित महिलेवर काही व्यक्तींनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी करण्यात आली.
या आंदोलनात नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनुभुले, गटनेत्या नगरसेविका मीरा शिंदे, संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे, नाना शिंदे, संतोष खेतमाळीस, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, नगरसेवक प्रशांत गोरे, अॅड. समित बोरुडे, प्रा. बळे सर, धनंजय कोथिंबिरे, नगरसेवक एम. डी. शिंदे, नगरसेवक संजय खेतमाळीस, नगरसेवक सुशील शिंदे, मीरा खेंडके, नगरसेविका चांदणी खेतमाळीस, सुनील वाळके, ऋषिकेश गायकवाड, गोरख घोडके, अविनाश घोडके, महावीर पटवा, संजय सावंत यांच्यासह श्रीगोंदा नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पोलिस निरीक्षकांची भूमिका स्पष्ट
या प्रकरणावर बोलताना पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले की, फिर्यादी पूनम दिनेश शिंदे यांच्या तक्रारीत चोरीचा उल्लेख नसून, पूरक जबाब दिल्यास संबंधित कलमे वाढवून कठोर कारवाई केली जाईल.
नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करत त्यांनी स्पष्ट केले की, कोणतीही घटना घडल्यास तात्काळ फिर्याद नोंदवावी, तसेच साक्षीदार व पंच म्हणून पुढे यावे. पोलिसांना कायद्याच्या चौकटीत राहून व न्यायालयीन आदेशांचे पालन करूनच कारवाई करावी लागते.
खाजगी सावकारी व अॅट्रॉसिटीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सर्व बाजूंची पडताळणी करूनच गुन्हा दाखल केला जातो. संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र संपर्क न झाल्यास गुन्हा नोंदवावा लागतो, असेही त्यांनी नमूद केले.
अतिक्रमणाविरोधात यापूर्वीही कारवाई केल्याचा उल्लेख करत, नागरिकांनी एकजुटीने सहकार्य केल्यास शहरातील गुन्हेगारीवर निश्चितच आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकूणच, या घटनेमुळे श्रीगोंद्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
चौकट-
बंदोबस्तासाठी पोलिसांची मागणी; अतिक्रमण हटविणार - मुख्याधिकारी
या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी सांगितले की, अतिरिक्त पोलिस बंदोबस्तासाठी अहिल्यानगर पोलिस अधीक्षकांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सध्या अभय योजना अंतर्गत सुरू असलेल्या वसुली मोहिमेमुळे तात्काळ पुरेसा पोलिस फोर्स उपलब्ध होणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, ७ व ८ एप्रिल रोजी बंदोबस्त मिळाल्यानंतर संबंधित परिसरातील सर्व अतिक्रमणे हटवून पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते
एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!
सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे
पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!
जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!