By : Sangharshkranti Team ,2026-03-24
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 24 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
गुणवडी ता. नगर, जि. अहमदनगर गुणवडी उत्कर्ष न्यास (गुण) यांच्या वतीने नगर-श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे तरुण, तडफदार व लोकप्रिय आमदार अॅड. विक्रमसिंह (दादा) पाचपुते यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रयास आपल्या गुणवडी गावाच्या उत्कर्षाचा या ध्येयाने प्रेरित या कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुंबई येथील दादर (पूर्व) परिसरातील वसंत स्मृती, दादासाहेब फाळके मार्ग येथे आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. सेवानिवृत्त कामगार-अधिकाऱ्यांमध्ये बाबासाहेब महादेव साळवे, दिलीप शिवराम साळवे, विलास शिवराम साळवे, सुनील शिवराम साळवे, मच्छिंद्र नानाभाऊ साळवे, संजय ज्ञानदेव साळवे , सतीश त्र्यंबक सातपुते, अशोक जाधव बाराटे, राजश्री मच्छिंद्र साळवे, यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
तसेच विशेष उपस्थिती म्हणून सूर्यभान (बापू) नागवडे, महेंद्र शेळके(माजी उपसरपंच), गणेश दिगंबर भागवत, बाळकृष्ण (दादा) साळवे, मनीष सिताराम साळवे, अनिल (खंडू) साळवे व संदीप (बालू) शहाजी शेळके यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये अॅड. आदित्य शिवराम साळवे, आकाश मच्छिंद्र साळवे, संकेत मच्छिंद्र साळवे व कु. नम्रता महेंद्र साळवे यांचा सहभागही उल्लेखनीय होता.
या प्रसंगी आमदार पाचपुते यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आपल्या भाषणात त्यांनी गुणवडी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, युवकांनी शिक्षण व सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद बाबासाहेब साळवे यांनी भूषविले. कार्यक्रमाची संकल्पना महेंद्र साळवे यांची असून समन्वयक म्हणून बिजू साळवे व मच्छिंद्र साळवे यांनी परिश्रम घेतले.
एकूणच, गुणवडी गावाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचा संदेश देणारा हा सत्कार सोहळा प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते
एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव
श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!
सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे
पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!
जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!
वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!