By : Sangharshkranti Team ,2026-07-27
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 27 जुलै 2026
(उज्वला उल्हारे)
शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांनी जामखेड येथील मुख्याध्यापक दत्ता काळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील विविध घडामोडी, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, संघटनात्मक प्रश्न तसेच शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.
प्रारंभी मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांचे स्वागत करून जामखेड तालुक्यातील शिक्षण क्षेत्राची सद्यस्थिती, विविध शाळांपुढील अडचणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या तसेच त्यावर उपाययोजना करण्याबाबतची माहिती दिली. उपस्थित शिक्षकांनीही विविध शैक्षणिक, प्रशासकीय व संघटनात्मक विषयांवर आपली मते मांडत समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण विधानपरिषदेसह विविध स्तरांवर सातत्याने आवाज उठवत असून, भविष्यातही त्यांच्या हक्कांसाठी कटिबद्ध राहणार असल्याची स्पष्ट भूमिका व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा सुरू ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यानंतर उपस्थित मान्यवरांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत आपुलकीच्या वातावरणात विविध शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली. शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि प्रशासन यांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
चौकट - या प्रसंगी शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये संजय वराट, बी. ए. पारखे, दत्ता काळे, दशरथ कोपनर, आप्पा शिरसाट, भरत लहाने, दत्तात्रय राजमाने, सोमनाथ राजुंडे, वैभव सांगळे, अशोक आढाव यांच्यासह अनेक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली.
संपूर्ण भेटीदरम्यान अत्यंत आपुलकीचे, स्नेहपूर्ण व सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळाले. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर विधायक चर्चा झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, या भेटीमुळे भविष्यात शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी अधिक प्रभावी समन्वय साधला जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!