By : Sangharshkranti Team ,2026-07-30
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 30 जुलै 2026
(उज्वला उल्हारे)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाला कोळगाव येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे अध्यक्षस्थान श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमदादा बबनराव पाचपुते यांनी भूषविले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना संबोधित करताना त्यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या समस्या तातडीने सोडविणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या महसूल समाधान शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांच्या महसुली व प्रशासकीय स्वरूपाच्या विविध अडचणींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. सातबारा उतारे, फेरफार, उत्पन्न, जात, रहिवासी व इतर दाखल्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांतील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे आणि विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले.
शिबिरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक अर्जाची तपासणी करून अनेक प्रकरणांवर तत्काळ निर्णय घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
चौकट - यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विशेष उपक्रमही राबविण्यात आला. आमदार विक्रमदादा पाचपुते तसेच श्रीगोंदा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना व नागरिकांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या शिबिराला विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, युवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिबिर यशस्वी ठरले असून शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रभावी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!