प्रा. डॉ. सविता भाऊसाहेब झरेकर-देशमुख यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी.

By : Sangharshkranti Team ,2026-07-30

प्रा. डॉ. सविता भाऊसाहेब झरेकर-देशमुख यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी.

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 30 जुलै 2026

(उज्वला उल्हारे)

 जिद्द, सातत्य, कठोर परिश्रम आणि संशोधनाची अखंड ओढ यांच्या जोरावर न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील प्राध्यापिका डॉ. सविता भाऊसाहेब झरेकर-देशमुख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रतिष्ठेची पीएच.डी. पदवी संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांच्या या यशामुळे न्यू आर्ट्स महाविद्यालयासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव उंचावला आहे.

कॉमर्स विषयात संशोधन मार्गदर्शक डॉ. मंगेश वाघमारे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांनी सलग चार वर्षे अभ्यासपूर्ण व सखोल संशोधन केले. संशोधनातील प्रत्येक टप्पा अत्यंत संयम, चिकाटी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करत त्यांनी आपला प्रबंध यशस्वीरित्या सादर केला.

दि. २९ जुलै २०२६ रोजी झालेल्या अंतिम ऑनलाइन तोंडी सादरीकरणानंतर चेअरमन डॉ. धीरज झाल्टे (नाशिक) तसेच बाह्य परीक्षक डॉ. सोनल काळे (मुंबई) यांच्या उपस्थितीत  त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. हा क्षण त्यांच्या अनेक वर्षांच्या परिश्रमांचे फलित ठरला.

डॉ. सविता झरेकर-देशमुख या गेली बारा वर्षे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. अध्यापनातील उत्कृष्टता जपत त्यांनी संशोधनाची आवडही जोपासली. कौटुंबिक जबाबदाऱ्या, अध्यापन आणि संशोधन यांचा उत्कृष्ट समतोल साधत त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवून अनेक विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

या संशोधन प्रवासात न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब सागडे, कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, बीबीए विभागप्रमुख तसेच संशोधन मार्गदर्शक डॉ. मंगेश वाघमारे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचे डॉ. सविता झरेकर-देशमुख यांनी नमूद केले. संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच हा यशस्वी प्रवास पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

डॉ. सविता झरेकर-देशमुख या अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी उपायुक्त नाना उर्फ रामकिसन देशमुख यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून रोटरी क्लब अहमदनगर मिडटाऊन, सहज फाउंडेशन तसेच विविध संस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व संशोधन वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

चौकट- यावेळी मा .सैनिक मनसुख वाबळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. सविता झरेकर-देशमुख यांनी अध्यापन, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि संशोधन यांचा सुंदर समतोल साधत प्रतिष्ठेची डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. त्यांचे यश हे केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जिद्दीमुळे, सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे आणि संशोधनातील समर्पणामुळे अनेक विद्यार्थी व भावी संशोधकांना प्रेरणा मिळेल. भविष्यातही त्या शैक्षणिक, संशोधन व सामाजिक क्षेत्रात अधिक मोठे योगदान देतील, असा आम्हाला विश्वास आहे.

विशेष म्हणजे, डॉ. सविता भाऊसाहेब झरेकर-देशमुख या शालिनी वाबळे व मनसुख वाबळे यांच्या भाची आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मनसुख वाबळे, शालिनी वाबळे तसेच समस्त वाबळे परिवाराच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधन व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

डॉ. सविता झरेकर-देशमुख यांची ही यशोगाथा जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण परिश्रम आणि संशोधननिष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण ठरत असून, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक शिक्षक, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणारी आहे.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!