गुरुस्थानी लोकनेते बबनदादा पाचपुते व प्रतिभाताई पाचपुते यांचे माऊली येथे पद्यपूजन!

By : Sangharshkranti Team ,2026-07-30

गुरुस्थानी लोकनेते बबनदादा पाचपुते व प्रतिभाताई पाचपुते यांचे माऊली येथे पद्यपूजन!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 30 जुलै 2026

(उज्वला उल्हारे)

गुरुपौर्णिमेच्या पवित्र आणि मंगलमय वातावरणात माऊली येथे महाराष्ट्राचे लोकनेते, माजी मंत्री मा. बबनरावजी (दादा) पाचपुते तसेच डॉ. प्रतिभाताई (आक्का) बबनरावजी पाचपुते यांचे पद्यपूजन करून स्वागत करण्यात आले. दादा आणि आक्का पंढरपूरच्या पवित्र वारीवरून परतल्यानंतरची ही पदाधिकाऱ्यांची पहिलीच भेट ठरली असून, या भेटीने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, प्रेरणा आणि आत्मीयतेची भावना जागृत झाली.

गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनाचा उत्सव मानला जातो. या पावन निमित्ताने दादा आणि आक्का यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या कार्याला व व्यक्तिमत्त्वाला कृतज्ञ अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी पद्यपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि समाजकार्यासाठी नव्या जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी बोलताना अनेक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, गेली पन्नास वर्षे दादा यांनी समाजसेवा, विकासाची दूरदृष्टी, जनतेप्रती असलेली निस्वार्थ बांधिलकी आणि प्रत्येक कार्यकर्त्यावर केलेले प्रेम व विश्वास यामुळे एक आदर्श नेतृत्व निर्माण केले आहे. तर प्रतिभाताई पाचपुते यांनी सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत सामाजिक बांधिलकीची वेगळी ओळख निर्माण केली आहे.कार्यक्रमातील वातावरण अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी होते.

गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा नव्हे, तर योग्य दिशा दाखवून जीवन समृद्ध करणारा दीपस्तंभ या भावनेने उपस्थितांनी दादा आणि आक्का यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या सहवासात काम करण्याची संधी ही आयुष्यातील मोठी संपत्ती असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.या आशीर्वाद व शुभेच्छा सोहळ्यासाठी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, सर्व नगरसेवक, युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ मान्यवर आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक एकात्मता, कार्यकर्त्यांतील स्नेह आणि नेतृत्वावरील विश्वास यांचे सुंदर दर्शन घडले.

गुरुपौर्णिमेच्या या पावन प्रसंगी उपस्थित सर्वांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली की, आदरणीय बबनदादा पाचपुते आणि प्रतिभाताई पाचपुते यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचे मार्गदर्शन समाजासाठी असेच प्रेरणादायी ठरो.अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली .

चौकट- गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा नव्हे, तर योग्य दिशा दाखवून जीवन समृद्ध करणारा दीपस्तंभ या भावनेने उपस्थितांनी दादा आणि आक्का यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या सहवासात काम करण्याची संधी ही आयुष्यातील मोठी संपत्ती असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!