By : Sangharshkranti Team ,2026-07-31
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 31जुलै 2026
(उज्वला उल्हारे)
पत्रकारितेतील अभ्यासपूर्ण कार्यशैली, प्रभावी संवादकौशल्य, संघटनात्मक नियोजन आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर श्रीगोंद्याचे युवा कार्यकर्ते अमोल कविटकर यांनी राज्याच्या राजकीय आणि माध्यम क्षेत्रात महत्त्वाची झेप घेतली आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांची महाराष्ट्र प्रदेश भाजप माध्यम विभागाच्या दौरा समन्वयक या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती केली असून, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यातील अमोल कविटकर यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात स्थानिक वृत्तवाहिनीतून केली. पत्रकारितेची आवड, बातमीमागील बारकावे समजून घेण्याची क्षमता आणि जनसंपर्क कौशल्य यांच्या जोरावर त्यांनी एबीपी माझा, साम मराठी आणि जय महाराष्ट्र यांसारख्या नामांकित वृत्तवाहिन्यांमध्ये काम करत माध्यम क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मैदानावरील वार्तांकन, संघटनात्मक समन्वय आणि प्रभावी संवाद यामुळे त्यांनी माध्यम क्षेत्रात विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून स्थान मिळवले.
माध्यम क्षेत्रातील समृद्ध अनुभवाचा उपयोग त्यांनी पुढे भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात केला. पक्षाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, माध्यमांशी समन्वय, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी पक्ष नेतृत्वाचा विश्वास संपादन केला. त्यांच्या याच कार्याची दखल घेत भाजपने त्यांच्यावर राज्यस्तरीय जबाबदारी सोपवत दौरा समन्वयकपदाची महत्त्वपूर्ण धुरा दिली आहे.
अमोल कविटकर हे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही ओळखले जातात. राज्यभरातील पक्षाच्या दौऱ्यांचे नियोजन, माध्यम समन्वय आणि संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होणार असल्याची भावना पक्षातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
चौकट - या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, प्रदेश माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर तसेच आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अमोल कविटकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अमोल कविटकर यांच्या राज्यस्तरीय नियुक्तीमुळे श्रीगोंदा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पत्रकारितेतून राजकीय संघटनात्मक नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास हा ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या या यशाबद्दल श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!
बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!
ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!
ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!
कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!
सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!
लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!
डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!
श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!
विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!
संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!
श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!
मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!
सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!
संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!
लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!
प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!