लोकशाहीर अण्णाभाऊंच्या विचारांची आज नितांत गरज -मा.सरपंच बाळासो उगले

By : Sangharshkranti Team ,2026-08-01

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या विचारांची आज नितांत गरज -मा.सरपंच बाळासो उगले

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 1ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त घोगरगाव येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी घोगरगावचे मा. सरपंच बाळासो उगले यांनी आजच्या सामाजिक वास्तवावर भाष्य करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आणि साहित्याची आज पूर्वीपेक्षाही अधिक गरज असल्याचे प्रतिपादन केले.

आपल्या मनोगतात ते म्हणाले, आज देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल क्रांती, अवकाश संशोधन आणि आधुनिक विकासाच्या गप्पा रंगत असल्या, तरी दुसऱ्या बाजूला शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. कष्टकरी घाम गाळूनही न्याय मोबदल्यापासून वंचित आहे. बेरोजगार तरुण संधीच्या प्रतीक्षेत आहे. महिलांवरील अत्याचार, सामाजिक विषमता, भ्रष्टाचार आणि अन्यायाची मालिका अजूनही थांबलेली नाही. अशा वेळी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाजाला जागे करणारा इशारा ठरते.

ते पुढे म्हणाले, अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीला कधीही सत्तेची गुलामगिरी करू दिली नाही. त्यांनी शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांचे प्रत्येक लिखाण अन्यायाच्या छाताडावर घाव घालणारे होते. त्यामुळे फकीरा हा केवळ कादंबरीतील नायक नसून अन्यायाविरुद्ध उभा राहणाऱ्या प्रत्येक स्वाभिमानी माणसाचे प्रतीक आहे.

सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी सांगितले की, आज जातीच्या नावावर द्वेष, धर्माच्या नावावर वैमनस्य, पैशाच्या बळावर माणुसकीचा लिलाव आणि सत्तेसाठी मूल्यांची तडजोड होताना दिसते. त्यामुळे अण्णाभाऊंची लेखणी पुन्हा हातात घेण्याची गरज आहे. त्यांचे साहित्य संघर्ष शिकवते, स्वाभिमान जागवते आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देते.

चौकट - यावेळी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास मा. सरपंच बाळासो उगले, मा. कुकडी संचालक बिभीषण उगले, अर्जुन उगले गुरुजी, मा.उपसरपंच बक्षुद्दीन शेख, राजे संभाजी संस्थेचे चेअरमन तानाजी बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश बेरड, युवा उद्योजक निलेश उगले, साजन उगले, महादेव वाबळे, आयुब शेख, संदीप उगले, ज्येष्ठ कार्यकर्ते बबन उल्हारे तसेच ग्रामस्थ व समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी अण्णाभाऊ साठे यांच्या समता, स्वाभिमान, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार करून ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!