पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जनतेचे प्रश्न जाणून घेत कुकडी,घोड च्या अधिकाऱ्यांना खडसावले!

By : Sangharshkranti Team ,2026-08-06

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जनतेचे प्रश्न जाणून घेत कुकडी,घोड च्या अधिकाऱ्यांना खडसावले!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 6 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

कुकडी-घोड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी श्रीगोंदा येथील नक्षत्र लॉन्समध्ये आयोजित बैठकीत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित नागरिकांचे प्रश्न शांतपणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देत दिरंगाईबाबत चांगलेच खडसावले. यावेळी नागरिकांनी कुकडी व घोड धरणाच्या पाणीप्रश्नासह पाणी वापर संस्थांच्या अडचणी, शासकीय जागांवरील अतिक्रमण तसेच विविध विकासकामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, श्रीगोंदेकरांनी मला अनेक प्रश्न विचारले. मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असून त्यांची सोडवणूकही करणार आहे. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांना मते दिली, त्यांना कधी हेच प्रश्न विचारले का?असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.

बैठकीत गणपतराव काकडे, पोपटराव खेतमाळीस, दिनकर पंधरकर, प्रशांत गोरे, शहाजी खेतमाळीस, बाळासाहेब महाडिक, गणेश झिटे यांच्यासह अनेकांनी विविध प्रश्न मांडले.

यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, ही बैठक केवळ प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आहे. हा काही जनता दरबार नाही. आपल्या सर्व समस्या व निवेदने  लेखी स्वरूपात सादर करा. त्या प्रत्येक प्रश्नाचा आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या माध्यमातून माझ्याकडे प्रभावी पाठपुरावा करून मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बैठकीत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोणत्याही कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कुकडीच्या पाणीप्रश्नावर मागील अनेक वर्षे केवळ राजकारण झाले, मात्र महायुती सरकारने ठोस निर्णय घेत दुष्काळी भागाला पाणी मिळवून दिल्याचा दावा त्यांनी केला. डिंबे–माणिकडोह बोगद्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असून शहरातील सरस्वती नदी सुशोभीकरणासाठी जलसंपदा विभाग व नगरपरिषद यांनी संयुक्त आराखडा तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी सांगितले की, १० ऑगस्ट रोजी माऊली येथे होणाऱ्या जनता दरबारात सर्व नागरिकांनी आपली निवेदने लेखी स्वरूपात सादर करावीत. प्रत्येक निवेदनाचा संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

दरम्यान, उपस्थितांमध्ये अशीही चर्चा रंगली की, आज जे प्रश्न मांडले जात आहेत, त्यांचा विचार २०२४ मध्येच झाला असता, तर अनेक अडचणी निर्माण झाल्या नसत्या.मात्र आता जनतेच्या प्रश्नांच्या कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समन्वयाने कार्यरत असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीस आमदार विक्रमदादा पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते,ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलकाताई अनभुले,महिला बालकल्याण सभापती मिराताई शिंदे, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणी फराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पगंधा भगत, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे ,भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.विक्रम भोसले , शहराध्यक्ष धनंजय कोथिंबीरे ,विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

चौकट - यावेळी सिना धरण भरण्याच्या प्रश्नावरही चर्चा झाली. थिटेसांगवी, घोगरगाव, चवर सांगवी, तरडगव्हाण पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने कोणत्याही लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडला नसतानाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नाची स्वतः दखल घेतली. भोसाखिंडी येथील पुलाच्या कामाची आपण प्रत्यक्ष पाहणी केली असून, संबंधित ठेकेदाराला काम तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण दाबाने सिना धरणामध्ये पाणीपुरवठा करता येणार असून, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!