जनतेचा प्रताप, विरोधकांचा विरोध डावलून विक्रमी जनता दरबार!

By : Sangharshkranti Team ,2026-08-12

जनतेचा प्रताप, विरोधकांचा विरोध डावलून विक्रमी जनता दरबार!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 12 ऑगस्ट 2026

(उज्वला उल्हारे)

श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला आणि विरोधाला डावलून माऊली परिसर अक्षरशः नागरिकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाला. विविध शासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत नागरिकांचे प्रश्न थेट ऐकून घेण्यात आले. या जनता दरबारात विविध प्रश्नांसंदर्भात २५० हून अधिक अर्ज व निवेदने प्राप्त झाली, तर आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि खास भेटीसाठी एक हजाराहून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे “जनतेचा प्रताप, विरोधकांचा विरोध डावलून विक्रमी जनता दरबार” असे चित्र माऊली निवासस्थानी पाहायला मिळाले.

जानेवारी २०२५ पासून सातत्याने जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. विधानसभा अधिवेशन तसेच विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही काळ जनता दरबार बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला मिळालेला हा मोठा प्रतिसाद नागरिकांचा या उपक्रमावर असलेला विश्वास अधोरेखित करणारा ठरला.

जनता दरबारात विविध शासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित असल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रश्नांसाठी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधता आला. प्रश्न समजून घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या, तसेच आवश्यक त्या प्रकरणांमध्ये पुढील पाठपुराव्याची दिशा निश्चित करण्यात आली. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता यांच्यातील थेट समन्वयामुळे अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी आमदार विक्रमदादा पाचपुते म्हणाले की, जनता दरबारात आलेल्या साधारण ८० टक्के प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. नागरिकांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित शासकीय विभागाकडे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र अधिकृत टीम कार्यरत आहे. संबंधित खात्यांशी सातत्याने संपर्क ठेवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. प्रश्न सुटत असल्याचा अनुभव नागरिकांना येत असल्याने जनता दरबाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे.

तालुकास्तरावर काही प्रश्न सहजपणे सोडविता येतात; मात्र काही प्रकरणे शासनाच्या नियमांमध्ये बसत नसल्याने त्यावर निर्णय घेणे शक्य होत नाही. अशा प्रकरणांमध्ये प्रशासनाला जबाबदार धरता येणार नाही. केवळ जनता दरबारात येऊन प्रश्न मांडणे पुरेसे नसून, त्यानंतर संबंधित प्रश्नाचा पाठपुरावा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे आमदार पाचपुते यांनी स्पष्ट केले.

जनता दरबारामध्ये दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नांना विशेष प्राधान्य देण्यात येत असून, त्यांना शक्य तितकी थेट सेवा व मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत आणि त्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाच्या माध्यमातून तत्काळ कार्यवाही व्हावी, हा जनता दरबारामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जनता दरबाराच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावर विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर देताना आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कोणी काहीही वल्गना केली तरी आम्हाला कोणालाही उत्तर देण्याची गरज नाही. आज जनतेनेच उत्तर दिले आहे. जनता दरबाराला मिळालेला प्रतिसाद हेच त्याचे उत्तर आहे. जनताच योग्य वेळी धडा शिकवेल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे जनता दरबाराला मिळालेल्या गर्दीला राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी जनता दरबाराला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगत, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली टीम सातत्याने काम करत राहणार असल्याचेही आमदार पाचपुते यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेणे, प्रशासनाशी समन्वय साधणे आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणे या माध्यमातून जनता दरबाराचा उपक्रम अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

माऊली निवासस्थानी झालेल्या या विक्रमी जनता दरबारातील हजारो नागरिकांची उपस्थिती आणि २५० हून अधिक अर्जांमधून जनतेच्या विविध प्रश्नांचे गांभीर्य समोर आले. विरोधकांचा विरोध आणि टीका बाजूला सारत जनता मोठ्या संख्येने जनता दरबारात सहभागी झाल्याने हा उपक्रम आगामी काळातही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत अशोक आव्हाड यांच्याकडून कमला देवी मंदिरासाठी २५ हजार ६७ रुपयांची देणगी!

बोबे परिवाराची कमलादेवी मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी ६० हजार १ रुपयांची देणगी!

ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या नवीन मुख्य कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन!

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित!

कासव आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही, अन्न भरवत नाही… तिची केवळ मायेची नजरच त्यांना वाढवते..

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

कमलादेवी मंदिरात ‘सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठा’चा भक्तिमय जागर!

सुनीताताई शिंदे यांची भाजप अहिल्यानगर दक्षिण महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड!

लिंपणगाव चे शेतकरी कुकडीच्या पाण्यापासून अद्यापही वंचित!

डॉ. प्रतिभाताई पाचपुते यांच्या हस्ते विधिवत पूजन व फीत कापून प्रवाशांच्या सेवेत नव्या बसेस दाखल!

श्री क्षेत्र कोंभळी येथे ह.भ.प. सुदाम कान्हा गोरखे गुरुजींचा ८३ वा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन!

विक्रम पाचपुते यांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी द्या!

संयुक्त परीक्षा ‘गट-ब’ २०२५चा निकाल नव्याने प्रसिद्ध करण्यासाठी आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा!

श्रीगोंद्याचे सुपुत्र सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती!

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित ,आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश!

मा.मंत्री बबनदादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते अक्का,सुवर्णाताई जगताप यांनी घेतले विधीवत दर्शन!

सुप्रसिद्ध रिल स्टार विराज औचीते यांचा वाढदिवस बालघर प्रकल्पातील बालकांसोबत उत्साहात साजरा!

संकटात पतसंस्थेचा आधार; विधाटे कुटुंबाला १२ लाखांची मदत, कर्जमुक्तीची दिलासादायक साथ!

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात!

प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनीचा स्वातंत्र्यदिनी सायकल देऊन गौरव!